देशभक्त रत्नाप्पा कुंभार

संस्थापक-कॉमर्स कॉलेज,कोल्हापूर

माजी विद्यार्थी संघाविषयी माहिती

दिनांक १५ एप्रिल २०११ रोजी समाजातील विविध क्षेत्रातील कॉमर्स कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येवून देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स माजी विद्यार्थी संघाची स्थापना केली.सदरचा संघ नोंदणीकृत असून त्याचे वार्षिक लेखापरीक्षण ही पूर्ण आहे.

सदरच्या संघामध्ये १३ माजी विध्यार्थ्यांचे संचालक मंडळ आहे.सदरचे संचालक मंडळ गतिमान व क्रियाशील आहे.सदरच्या संघामार्फत बरेचसे कार्यक्रम घेतले जातात.संघामार्फत कॉलेजच्या विध्यार्थ्यांचे हित जपले जाते. तसेच सर्व माजी विध्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे काम हा संघ करतो.महाविध्यालयामध्ये शिकणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळेचे,शिबिराचे आयोजन केले जाते.महाविध्यालयात वेळोवेळी सहकार्य ही केले जाते.

महाविध्यालयात संघामार्फत बोअरवेल, LCD प्रोजेक्टर, संगणक, क्रीडांगण इत्यादी साठी सहकार्य केलेले आहे.सर्वांनी ह्या संघाचे सदस्य व्हावे ही विनंती.